TOD Marathi

टिओडी मराठी, लंडन, दि. 24 जुलै 2021 – ब्रिटनचे आरोग्यमंत्री करोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही पुन्हा करोना पॉझिटिव्ह आलेत. शुक्रवारी आरोग्य मंत्री साजिद जावीद यांच्याबरोबर एका बैठकीमध्ये बोरीस जॉन्सन व ऋषी सुनक सामील झाले होते. साजिद यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसत आहेत. यावरून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

जॉन्सन यांनी साजिद यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याने त्यांच्या संपर्कामध्ये येऊनही होम आयसोलेशमध्ये राहण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी टीकेचा भडीमार केल्याने अखेर त्यांनी होमआयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले.

लॉकडाऊनचे सर्व नियम ब्रिटनमधून हटविले गेले असले तरी ऍप आधारित टेस्ट अँड ट्रेस प्रणालीचा वापर केला जातोय. अर्थात हे बंधनकारक नाही. यात हे ऍप मोबाईलवर असेल तर युजरला करोना संक्रमिताच्या संपर्कामध्ये आल्यास होम आयसोलेशची सूचना मिळते.

पंतप्रधान जॉन्सन एप्रिलमध्ये करोना संक्रमित झाले होते. त्यांना ३ दिवस आयसीयुमध्ये काढावे लागले होते. देशात बंधने हटली असली तरी नागरिकांना सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केलं आहे.