TOD Marathi

किसान युवा क्रांती संघटनेमुळे ‘खत दरवाढ’ मागे; चालविला ‘खत दरवाढीचा जाहीर निषेध’चा हॅशटॅग

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 23 मे 2021 – किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रथम केंद्र शासनाने केलेल्या खत दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे ‘खत दरवाढ’ मागे घेतली. संपूर्ण राज्यात ‘खत दरवाढीचा जाहीर निषेध’ हा हॅशटॅग चालवला, ज्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्र राज्यात खत दरवाढीसंदर्भात पहिली जाहीर भूमिका किसान युवा क्रांती संघटनेने घेतली होती. नाशिक जिल्ह्यातील माळवाडी येथे खत दरवाढ पत्रकाची होळी करून दरवाढीचा निषेध नोंदविला. त्यानंतर संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या तालुक्‍यामध्ये किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून खत दरवाढ पत्रकांची पदाधिकाऱ्यांनी होळी करण्यात आली.

कोरोनाच्या काळामध्ये देखील ज्या शेतकऱ्यांनी देशासाठी काम केले. त्या शेतकऱ्यांवर दरवाढ करणे हे अन्यायकारक आहे. शासनाच्या या धोरणामुळे शेती व्यवसाय करणे अवघड होणार आहे.

याविषयावर बोलताना संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी भूमिका स्पष्ट करून म्हणाले, “केंद्र शासनाने सबसिडी देऊन खत दरबार मागे घेतल्याबद्दल मी केंद्र शासनाचे आभार व्यक्त करतो, परंतु सबसिडी देऊन दरवाढ मागे घेण्याऐवजी शासनाने खत कंपन्यांना सूचना देऊन संपूर्ण दरवाढ मागे घ्यायला हवी. कारण, जर भविष्यात सबसिडी मागे घेतली तर पुन्हा दरवाढीचे संकट शेतकऱ्यांवर येईल, हे संकट येऊ नये, याकरिता शासनाने प्रयत्न करावेत, अशी आमची मागणी आहे, असे मत किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी व्यक्‍त केले आहे.

किसान युवा क्रांती संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यामुळे संपूर्ण राज्यातील किसान युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. इथून पुढच्या काळात शेतकरी चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे, असे देखील गोसावी यांनी सांगितले आहे.