TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 22 मे 2021 – सन 2019-20 मध्ये झालेल्या ‘स्मार्ट व्हीलेज’ तपासणीमध्ये लातूर तालुक्यात ‘गंगापूर’ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गंगापूरच्या इतिहासात ‘स्मार्ट व्हीलेज ‘मध्ये पहिल्यांदा बक्षीस मिळाले आहे. या स्पर्धेमध्ये गंगापूरसह निवळी गाव दुसऱ्या आणि कव्हा हे गाव तिसऱ्या स्थानावर राहिले आहे. आता ‘गंगापूर’ जिल्ह्याच्या स्पर्धेत उतरणार असून त्यासाठी तयारी सुरु केली आहे. गंगापूरने तालुक्यात ‘एक नंबर’ पटकाविल्याने विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

जिल्हा परीषदकडून लातूर तालुक्यांतील ‘स्मार्ट व्हीलेज’ तपासणीसाठी निलंगा पंचायत समितीची टीम नियुक्त केली होती. निलंगा गटविकास अधिकारी ताकभाते यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय टीमने हि तपासणी केली. तपासणीअंती त्यांनी अहवाल सादर केला असता गंगापूरने बाजी मारून प्रथम क्रमांक मिळवला.

मागील ३ वर्षात गंगापूर गावाने विकास कामात उत्तुंग भरारी घेतली आहे. तसेच नवीन ग्रामपंचायत कार्यालय, चार पाणी शुध्दीकरण केन्द्र, पिठाची गिरणी, मिरची कांडप, संपूर्ण गावात स्पिकर, सार्वजनिक पाणीपुरवठा नियोजन, दरगाह सुशोभीकरण, मुख्य रस्ता, डिव्हायडरसह मध्ये पोल, स्मशानभूमीमध्ये रस्ता व निवारा शेड, अल्पसंख्यांकांच्या वस्तीतील रस्ते, अल्पसंख्याकसह सुतार आणि सार्वजनिक सभागृह, कचरा उचलणे ट्रॅक्टर व वृक्षलागवडीसाठी टॅंकर अशा अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत.

लोकनियुक्त सरपंच बाबु खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली हि विकासकामे झाली आहेत. या स्पर्धेत गंगापूरला ८४ गुण, निवळी गावाला ८२ गुण, तर कव्हा ७६ गुण मिळाले असून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे. लातूर तालुक्यात प्रथम क्रंमाक आल्यामुळे गंगापूर गावात आनंदाचे वातावरण आहे. आता जिल्ह्यात सुध्दा गंगापूरने प्रथम क्रंमाक मिळवा, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत.

लोकनियुक्त सरपंच बाबू खंदाडे, उपसरपंच रफीक शेख, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मिंड, ईश्वर शेलार, रेणुका वाघमारे, शोभा बनसोडे, गुणवंत वाघे, सतीश कानडे, उषा गायकवाड, फरजानबी शेख, काशीबाई लष्कर, जन्नतबी पठाण, जे जी चिवडे आदींच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतने प्रथम क्रंमाक पटकावला आहे.

त्यासोबत सर्व गावकरी, तंटामक्ती अध्यक्ष सुधाकरराव शिंदे, बचतगटाकडून प्रमुख म्हणून शितल शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, महेश गोरे, किसन तळेकर, महेबुब शेख, विकास गायकवाड, गोविंद चिवडे, संगणकचालक शिवाजी नाथबोणे, रोजगार सेवक शिवसागर देशमाने, अंगणवाडीच्या गाडेकर, दंडीमे, शेख, ग्रामविकास अधिकारी राजश्री परचंडराव यांच्या प्रयत्नातून हा प्रथम क्रमांक मिळाला आहे.

तसेच प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डाॅक्टर प्रताप इगे, मुख्याध्यापक भवार, खेडकर, स्वामी यांचे सहकार्य लाभले आहे. गंगापूर सोसायटी चेअरमन हणमंतराव खंदाडे, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष दत्तात्रय जी बनसोडे, विस्तार अधिकारी दिलीप भिसे, गटविकास अधिकारी श्याम जी गोडभरले, तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केन्द्रे, आमदार अभिमन्यु पवार, पालकमंत्री अमित देशमुख, माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून देखील ‘गंगापूर ग्रामपंचायत स्मार्ट व्हीलेज’मध्ये प्रथम क्रमांकावर आली आहे.

याप्रंसगी सरपंच आणि टीमचे अभिनंदन व्हाईस चेअरमन सुग्रीव वाघे, पंचायत समिती अरविंद सुरकुटे, गोरोबा फुटाणे, चाॅंद शेख, सतिष धोत्रे, सिंकदर शेख, सुजित वाघे, विनोद दंडीमे, प्रल्हाद गायकवाड, मंगेश खंदाडे, विष्णु वाघमारे, आण्णासाहेब शिंदे, बाबुलाल शेख, प्रभाकर तळेकर, आकाश कुकडे आदींनी केले. आता गंगापूरकरांनी जिल्ह्यात प्रथम क्रंमाक मिळविण्यासाठी तयारी सुरु केली आहे.