TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 22 मे 2021 – कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणाचा प्राथमिक तपास सीबीआयने थांबवला आहे. २०१८ पासून सीबीआयने प्राथमिक तपास सुरु केला होता.

लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी आणि मुली चंदा आणि रागिणी यांच्यावर २०११ मध्ये ४ लाख रुपयांमध्ये एबी एक्स्पोर्ट्स ही कंपनी खरेदी केल्याचा आरोप ठेवला होता. या एबी एक्स्पोर्ट्सने दिल्लीतल्या न्यू फ्रेंड्स कॉलनीत ५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती.

कोट्यावधी रुपयांची कंपनी लालू यांना केवळ ४ लाख रुपयांना मिळाली होती. यानंतर हा पैसा एबी एकस्पर्ट्सने डीएलएफच्या माध्यमातून नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि बांद्रा स्टेशन अशा प्रकल्पांकरता लाच म्हणून दिली.

काही दिवसांपूर्वी रांची कारागृहातून लालू प्रसाद यांची जामिनावर मुक्तता झाली होती. झारखंड उच्च न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केलाय. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहेत.

त्यासोबत त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यासह काही शर्थी अटी ठेवल्या आहेत. मंजुरीविना त्यांना देशबाहेर जाता येणार नाही. तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई केली आहे.

त्यांना चारा घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये कारागृहात ठेवलं होतं. तीन वर्षांहून अधिक काळ कारागृहात राहिल्यानंतर लालू प्रसाद यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. त्यांच्या तब्येतीमुळे ते काही काळ दिल्ली मधील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. तिथून बाहेर पडल्यानंतर ते मुलगी मीसा भारती यांच्या घरी राहत आहेत.