TOD Marathi

बिहारमध्ये महागठबंधनचं सरकार स्थापन करत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे बिहारमध्ये आता राजद आणि आरजेडीसह महागठबंधनचं सरकार असणार आहे. (Nitish Kumar took oath as CM Bihar and Tejashwi Yadav as DyCM)

आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेक्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते या शपथविधीला उपस्थित नव्हते. नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र कधी होणार? याबाबत सध्या कोणतीही माहीती समोर आलेली नाही.

एकीकडे महाराष्ट्रात भाजप सत्तेत आले, तर बिहारमध्ये नितीश कुमार आणि युतीचे सरकार कोसळले. त्यामुळे भाजपला हा धक्का मानला जातोय.