TOD Marathi

टेनिसपटू सेरेना विल्यम्स लवकरच निवृत्त होणार

संबंधित बातम्या

No Post Found

टेनिस क्षेत्रावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी तसेच 23 ग्रँड स्लॅम विजेती दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी अमेरिकन ओपन तिच्या कारकीर्दीतली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असेल. एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिने याबाबतच सांगितलं आहे. (Serena Williams writes about her retirement on social media)

ही बातमी शेअर करताना त्यांनी लिहिले, ”
आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. तो काळ नेहमीच खडतर असतो. आपण ज्या गोष्टीचा आनंद घेतो, त्यापासून दूर जावे लागते.

आता उलट मोजनी सुरू झाली आहे. मात्र, आता आपली कौटुंबिक जबाबदारी आणि अध्यात्मातील गोडी जपण्यासह इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे. आता आणखी काही आठवडे आपण टेनिस खेळणार आहे.”

सेरेनाने अमेरिकन ओपनमध्ये अप्रतिम कामगिरी करत आपल्या कारकिर्दीत एकूण 6 वेळा विजेतेपद पटकावले. 1999, 2002, 2008, 2012, 2013 आणि 2014 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले. त्याच वेळी, ती 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेती देखील राहिली. आणि आता तिने निवृत्तीची घोषणा केली आहे.