शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली. (Uddhav Thackeray spoke with Nitish Kumar and Tejashwi Yadav) बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर जदयू आणि राजद यांच्यासह मित्र पक्षांचं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांनी भाजपचा जदयूला फोडण्याचा डाव होता असा आरोप करत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नीतीश कुमार जी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जी आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!
– उद्धव बाळासाहेब ठाकरे
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 12, 2022
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपनेच शिवसेना फोडल्याचा आरोप करण्यात येत होता. याशिवाय भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याचा आरोप देखील विरोधी पक्षाच्या वतीने केला जातोय.
बिहारमधील नव्या (Bihar Politics) राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.