TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 18 जुलै 2021 – दैनिक लोकमत आणि प्रा. मोटेगावकर सरांच्या RCC पॅटर्नच्या वतीने आज रविवारी (दि. 18 जुलै) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. या शिबिरात महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, प्रा. शिवराज मोटेगावकर, आयएएस अधिकारी जिथीन रेहमान, मिलन मोटेगावकर यांच्यासह RCC च्या 90 शिलेदारांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

सद्यस्थितीत महाराष्ट्रासह देशात भासणारी रक्तसाठ्याची टंचाई लक्षात घेऊन दैनिक लोकमत ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान चळवळीचा उपक्रम राबवत आहे. याला प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी साथ दिली.

त्यानुसार दैनिक लोकमत आणि प्रा. मोटेगावकर सरांच्या RCC पॅटर्नच्या वतीने हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. याला उत्तम प्रतिसाद लाभला.

प्रा. मोटेगावकर सरांच्या RCC शैक्षणिक संकुलामध्ये या रक्तदान शिबिर पार पडलं. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, RCC चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, दैनिक लोकमतचे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, आयएएस अधिकारी जिथीन रेहमान, मिलन मोटेगावकर, तुकाराम पाटील, नितीन खोत, रमेश भुतडा, सखी मंचच्या अध्यक्षा मंदाकिनी शेटकार आदी उपस्थित होते.

यावेळी सुरूवातीला प्रास्ताविक करताना पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी ‘लोकमत रक्ताचे नाते’ या उपक्रमाबाबत माहिती दिली. तर, प्रमुख उपस्थिती असलेल्या महानगरपालिका आयुक्तांनी RCC च्या वतीने आयोजित या लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले. तसेच RCCच्या वतीने सातत्याने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.धर्मराज जांभळे, नामदेव मोटेगावकर डॉ.राजू वानरे, प्रमोद घुगे , उमेश बुर्गे, प्रशांत सूर्यवंशी आदींसह RCC च्या सर्व टीमने परिश्रम घेतले आहेत.

RCC परिवाराने जपली सामाजिक कार्याची परंपरा :
सध्याच्या या कोरोना काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता दैनिक ‘लोकमत’ ने ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही लोकचळवळ उभी केली आहे. याच माध्यमातून हजारो जणांनी रक्तदान केलं आहे.

या लोककल्याणकारी उपक्रमात सहभागी होऊन RCC परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपल्या सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवली आहे, असे लातूर-नांदेड येथील RCC पॅटर्नचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी म्हंटले आहे.