TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जुलै 2021 – आता इंडियन बँक्स असोसिएशन लवकरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 6,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित भांडवलासह नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड किंवा बॅड बँकची स्थापना करणार आहे. सुरुवातीला 100 कोटी रुपयांच्या भांडवलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयबीएला यासाठी कंपनीच्या रजिस्ट्रारकडून परवाना मिळाला आहे.

याबाबत सूत्रांनी सांगितले कि, कंपनीच्या नोंदणीनंतर 100 कोटींच्या आरंभिक भांडवलाची प्रक्रिया मार्गदर्शक सूचनांनुसार केली जात असते. त्याची पुढची पायरी ऑडिटची असणार आहे. त्यानंतर आयबीए मालमत्ता पुनर्निर्माण कंपनीच्या परवान्यासाठी रिझर्व्ह बँकेत अर्ज करणार आहे.

2017 साली भारतीय रिझर्व्ह बँकेने भांडवलाची आवश्यकता 2 कोटी रुपयांवरून 100 कोटी रुपयांवर आणली होती. बॅड लोन घेण्यासाठी अधिक पैशांची गरज आहे, असे केंद्रीय बँकेचे मत आहे.

कायदेशीर सल्लागार एझेडबी व भागीदारांच्या सेवा विविध नियामक मान्यता प्राप्त करण्यासाठी गुंतलेल्या आहेत. यासह हे इतर कायदेशीर औपचारिकता पूर्ण करणार आहे. यासाठी आरंभिक भांडवल आठ बॅंकांद्वारे ठेवणार आहे. या बँका यासाठी वचनबद्ध असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर एनएआरसीएल आपला भांडवल बेस वाढवून 6,000 कोटी करण्यात येणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर अन्य इक्विटी सहभागी यात सामील होणार आहे. त्याचे संचालक मंडळही वाढविणार आहे. आयबीएला बॅड बँक सुरू करण्याची जबाबदारी दिली आहे. एनएआरसीएलचे प्रारंभिक मंडळ गठित केले आहे.

कंपनीने एसबीआयच्या दबाव मालमत्ता तज्ज्ञ पी. एम. नायर यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. मंडळाच्या इतर संचालकांमध्ये आयबीएचे मुख्य कार्यकारी सुनील मेहता, एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक एस. एस. नायर व कॅनरा बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अजित कृष्णा नायर यांचा समावेश असणार आहे.