MLA बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात NCP चे इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन ; केंद्र सरकारचा जाहीर निषेध

टिओडी मराठी, लातूर, दि. 3 जुलै 2021 – घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घरगुती गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात कोविड -19 निर्बंधाचे नियम पाळून राज्यव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा आणि शहराच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच  केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या जुलमी धोरणामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जनतेवर लादलेली अन्यायकारक दरवाढ आणि धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे.

या आंदोलनामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे, शहर अध्यक्ष मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष, सर्व सेल महिला, युवक विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींचा सहभाग होता.

Please follow and like us: