TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 18 जून 2021 – लोकसभेतील 540 खासदारांपैकी 403 खासदारांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचा मार्ग मोकळा झालाय. अनेक खासदारांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाल्याने दुसरा डोस दिला नही. त्यामुळे आता जुलै महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे.

30 खासदारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली की नाही? याबाबत काही माहिती दिली नाही. त्यामुळे या संसदेचे कर्मचारी या खासदारांना सातत्याने संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनामुळे संसदेच्या कामकाजावरही परिणाम झालाय, त्यामुळे मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन लवकर संपविले.

संसदेत 40 हून अधिक बिल आणि पाच अध्यादेश प्रलंबित आहेत. देशामध्ये आतापर्यंत 50 आमदारांना कोरोनाची लागण झालीय. तर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह ३ खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

आजही भारतातील काही भागांत कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोना चाचणी आणि सोशल डिस्टन्सचे पालन करून अधिवेशन घेतले जाणार आहे.