TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 ऑगस्ट 2021 – कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा इशारादिला जात आहे. जागतिक देशांसह भारतातही कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा आढळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ७६ जणांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहेत. यात लसीकरण झालेल्यांचाही समावेश आहे. डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. आतापर्यंत राज्यात ५ डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे सांगितले जात आहे.

कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत आहे. सध्या राज्यामध्ये डेल्टा प्लसचे एकूण ७६ रुग्ण आहेत. तर यापैकी लस घेतलेल्या १८ जणांना याची लागण झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. सोमवारी राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या १० रुग्णांची नोंद केली आहे. यापैकी सहा कोल्हापूर, तीन रत्नागिरी तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण आहे.

लस घेऊनही 18 जणांना लागण –
महाराष्ट्र राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेल्या एकूण ७६ रुग्णांपैकी १० रुग्णांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले होते. तर १२ लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे.

या रुग्णांत ३९ महिलांचा तर ९ लहान मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्यात तपासण्या केल्या जात आहेत.

महाराष्ट्र राज्यात डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मुंबईत ११, जळगावमध्ये १३, रत्नागिरीत १५, कोल्हापूरमध्ये ०७, ठाण्यात ०६, पुण्यात ०६, रायगडमध्ये ०३, पालघरमध्ये ०३, नांदेडमध्ये ०२, गोंदियात ०२, सिंधुदुर्गमध्ये ०२, तर, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड या ठिकाणी डेल्टाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलाय.

महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केलाय. १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.

मुंबईत आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागत आहे.

६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. देशातही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला आहे. देशात नागरिकांना दिलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे घेई आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.