पुणे:
दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. (Heavy rain in Pune again) शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या भागात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. आज दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाला रात्री ९ च्या सुमारास अचानक सुरूवात झाल्याने पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
शहरातील सिंहगड रस्ता परिसरात अति मुसळधार पाऊस सुरू झाला. पुढील २ तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फुरसुंगी, उरुळी देवाची आणि परिसराला वाऱ्यासह विजेच्या कडकडाट आणि जोरदार पावसाने झोडपले आहे. तसेच नगर रस्ता परिसरात आता पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावणेदहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. स्वारगेट, महर्षी नगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. यासोबतच बाणेर-बालेवाडी भागातही जोरदार पाऊस आहे.