TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 ऑगस्ट 2021 – एका वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ हून २४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शाह, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ‘फेमस’ झाल्याचे आढळले आहे. याबाबत एका इंग्लिश चॅनेल आणि इंडिया टूडे मूड ऑफ द नेशनने सर्व्हे केला आहे.

Mood of the Nation August 2021 हा सर्व्हे १० जुलै ते २० जुलै यादरम्यान केला आहे. या पोलमध्ये देशातील १९ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघ आणि २३० विधानसभा मतदारसंघाचा समावेश केला आहे, असे त्यांचे म्हणणं आहे.

मागील वर्षभरापासून जगात तसेच देशात कोरोनामुळं आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. देशामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते.

या विविध घटनांचा एका इंग्लिश चॅनेलने सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तपासली असता ती ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर घसरली आल्याचं समोर आलं आहे.

तर, इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलच्या सर्व्हेतून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरली असल्याचं समोर आलं आहे. या सर्व्हेमध्ये विचारण्यात आलं होतं की, भारतासाठी पुढील पंतप्रधान कोण असावा?, यावर ऑगस्ट २०२१ मध्ये केवळ २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली. तर, जानेवारी २०२१ मध्ये याच प्रश्नाला ३८ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दिली होती.

तर ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांनी पसंती दिली होती. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली असली तरी भाजपशी संबंधित दोन बड्या नेत्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यात केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश होत आहे.

सर्व्हे पोलनुसार, विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं पाहिलं तर राहुल गांधी यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये १० टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ७ टक्के आणि ऑगस्ट २०२० मध्ये ८ टक्के लोकांनी पसंती मिळाली आहे.

त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ २ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली होती. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाची लोकप्रियता प्रचंड वाढलीय.

ऑगस्ट २०२० केवळ २ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हावं, यासाठी पसंती दर्शवली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा दुप्पट होऊन ४ टक्के झाला तर ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के झालाय.

या पोलनुसार, राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांच्या लोकप्रियतेत थोडी वाढ झाली आहे. तर सोनिया गांधी यांची लोकप्रियता घटली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये २ टक्के लोकांनी प्रियंका गांधींच्या नावाला संमती दिली असून ऑगस्ट २०२१ मध्ये ४ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज