TOD Marathi

नाशिक : नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshvar Temple Nashik) शंकराच्या पिंडीवर पुन्हा एकदा बर्फ जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. भाविक भक्तांसाठी हा मोठा चमत्कार असून पिंडीच्या मध्यभागी बर्फ जमा झाल्याने हा चमत्कार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

या मंदिरात भारत-चीन युद्धानंतर १९६२ मध्येही असाच बर्फ जमा झाल्याची नोंद करण्यात आली होती. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर हा चमत्कार झाल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे हा शंकराचाच चमत्कार असल्याचं भाविकांचं म्हणणं आहे.

ईशान्य भारतातील आसाममधील मोठा भाग पाण्याखाली गेल्यानंतर (flood in Assam) त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा पिंडीवर चमत्कारिक बर्फ दिसून आला. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करून अधिकृत माहिती मंदिर प्रशासन देणार असल्याची माहिती आहे. मात्र हा बर्फ पाहण्यासाठी आता भक्तांची गर्दी होत आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं देशभरात नाव आहे. त्यामुळे आता या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.