TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 24 जून 2021 – बलाढ्य अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांचा मुलगा हंटरमुळे बायडेन यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. या संदर्भात न्यूयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार हंटर याने एका कॉलगर्लसह रात्र घालविली. याबद्दल तिला द्यायचे पैसे वडील बायडेन यांच्या खात्यातून दिले. ही रक्कम 25 हजार डॉलर्स म्हणजे 18 लाख रुपये आहे. अर्थात बायडेन यांना याची अजिबात माहिती नव्हती, असेही सांगितले जात आहे.

हंटर याने हॉलीवूडच्या चेरॉ मॉरमोंट हॉटेलमध्ये कॉलगर्ल सह रात्र घालविली होती. त्यावेळी त्याने अश्लील व्हिडीओ तयार केले. मे महिन्यामध्ये केलेल्या या प्रवासात हंटरने एमराल्ड फँटसी गर्ल या भाड्याने मुली पुरवणाऱ्या माध्यमातून हिरवे डोळे असलेल्या, रशियन, ‘याना’ नावाच्या मुलीची निवड केली.

यावेळी हंटरने खोटे नाव घेतले होते व मद्य प्राशन केले होते. पेमेंट करताना त्याच्या खात्यातून पैसे जात नव्हते, तेव्हा त्याने वडिलांच्या खात्यातून पैसे भरले.

ही सर्व माहिती हंटरच्या लॅपटॉपमधून मिळाल्याचा दावा केला जातोय. हा लॅपटॉप हंटर डायरीप्रमाणे वापरत असतो. त्यात अनेक मेसेजेस, फोटो, ई मेल्स, चॅटस, अनेक सेल्फी आहेत. हा लॅपटॉप हंटरने दुरुस्तीसाठी पाठविला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, असे सांगितले जात आहे.