TOD Marathi

Taliban च्या हातात अफगाणिस्तान गेल्यानंतर Joe Biden राष्ट्राला उद्देशून भाषणात म्हणाले ; अपेक्षेपेक्षा फारच लवकर…

टिओडी मराठी, दि. 17 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केलं आहे. बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अफगाणी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. अफगाणी नेते संघर्ष न करता हार मानून देश सोडून पळून गेलेत, असे मत बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.

जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य आहे, असेही म्हटलं आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचे सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचं हे पहिलं भाषण होतं.

जो बायडेन म्हणाले, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षानंतर मला एक गोष्ट समजली की अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कर परत बोलवण्यासाठी योग्य अशी कोणतीच वेळ नव्हती. यामागील धोक्याची आम्हाला जाणीव होती. मात्र, खरं सांगायचं झाल्यास सर्व घटना या आम्हाला अपेक्षित होत्या, त्यापेक्षाही कमी वेळत घडल्या आहेत.

अफगाणिस्तानमधील राजकीय नेत्यांनी लवकर हार मानली आणि ते देश सोडून पळून गेले. अफगाणिस्तानचे लष्करही कोलमडलं आहे.असे बायडेन यांनी म्हटलं आहे. तर, अफगाणिस्तानमधून लष्कर मागे बोलवण्याच्या निर्णयावर सर्वच स्तरातून बायडेन यांच्यावर टीका होत आहे. तरीही ते त्यांच्या निर्णयावर कायम राहिलेत.