TOD Marathi

काबूल: अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आलं आहे, तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम केल्याची माहिती आहे. हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात नवरात्रीनिमित्त कीर्तन भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

तालिबानचे राज्य आल्यानंतर मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंवरही आता बंधनं घालण्यात आली आहे. मात्र, तरीही धर्मिक कार्यक्रम अजूनही सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इथल्या असमाई मंदिरात किर्तन, जागरणाचं आयोजन करण्यात आलं.

अस्माई मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्त काबुलच्या असमाई मंदिरात किर्तन, जागरण तर झालंच, शिवाय भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात गरीब लोकांना अन्नदान करण्यात आलं. ज्यात बहुतांश हिंदू आणि शीख नागरिक होते. तालिबानकडून या कार्यक्रमात कुठलाही व्यत्येय आला नाही.