TOD Marathi

पुणे: आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टिकात्मक सल्ला दिला आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत आहेत. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.

सगळ्या परीक्षा MPSC मार्फतच घ्या, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षार्थींना एसटीचा प्रवास मोफत करु देण्याची मागणीही त्यांनी दिली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन रोहित पवार यांनी सरकारकडे या महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

ऑक्टोबरच्या २४ आणि ३१ तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा होणार आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज उमेदवारांनी भरले आहेत. मात्र, सगळ्या संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं दोन परीक्षांचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांला एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. जिल्हा बदलून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळाल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.