TOD Marathi

आजची पौर्णिमा ‘या’ देशात खास, इथं दिसणार Honey Moon, Strawberry Moon, Hot Moon अन Rose Moon

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 24 जून 2021 – ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा हि वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते तेही हिंदू पंचांगानुसार. मात्र, परदेशात जून महिन्यात येणारी पौर्णिमा आणि त्यादिवशीचा चंद्र अनेक नावांनी ओळखला जातो.

सूर्य मावळल्यावर आकाशात चंद्र उगवला की, वेगळाच प्रकाश भूतलावर पसरतो. हा चंद्र १५०० सालापासून ‘हनीमून’ म्हणून ओळखला जातो. मात्र, विवाहाशी याचा काही संबंध नाही. या काळात मधमाशांची पोळी मधाने भरून वाहू लागतात. परदेशात मध काढण्याच्या कामाची सुरवात यावेळी केली जाते म्हणून या काळात हनी मून म्हणतात.

अर्थात या चंद्राला स्ट्रॉबेरी मून, हॉट मून, रोझ मून अशी नावे आहेत. नासा वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, आज २४ जून रोजी चंद्र पृथ्वीच्या चारी बाजूनी अंडाकार कक्षेत फिरत असताना पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. त्यामुळे तो आपणाला मोठा दिसतो.

अमेरिकेतील एल्गोनक्वीन आदिवासी या दिवशी स्ट्रॉबेरीची तोडणी सुरु करतात म्हणून त्याला स्ट्रॉबेरी मून असंही म्हटले जाते. हा चंद्र लाल रंगाचा नसतो तर चमकदार पिवळा पण, किंचित लालसर असा दिसतो.

परदेशात जून हा उन्हाळा सुरु होण्याचा महिना आहे. त्यामुळे या जून महिन्या मधील पौर्णिमेच्या चंद्राला हॉट मून असेही म्हटले जाते. जगात अनेक देशात या दिवशी गुलाब तोडणी सुरु होते म्हणून तो ‘रोझ मून’ म्हणूनही ओळखला जातो.