TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 30 जून 2021 – आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा अधिक मताने जिंकू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा, असे सूचित केलंय. मात्र, विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त असल्याने तो विषयही प्रलंबित आहे. तो विषय निकाली काढलात तर 12 आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असा आमचा आग्रह आहे.

याची आठवणही मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिलीय. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ. पण, त्याअगोदर 12 आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा, असा विनंतीवजा आग्रह नवाब मलिक यांनी राज्यपालांना केला आहे.