केसरकरांसाठी आमच्याकडे १ तारखेनंतर नोकरी आहे!

सिंधुदुर्ग : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि राणे (Rane Family) कुटुंबातील वाद आता चांगलाच शिगेला जाऊन पोहोचला आहे. केसरकर यांनी नुकतंच राणेंनाही डिवचलं आहे. यावरून आता निलेश राणे (Nilesh Rane) चांगलेच आक्रमक झाले आहेत.

यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात, दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे. (Nilesh Rane Tweet)

केसरकर यांनी मागेच राणे कुटुंबावर जोरदार टीका केली होती. राणे कुटुंबांवर टीका करताना, अभिनेते सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली असा आरोपही त्यांनी यावेळेस केला होता.

Please follow and like us: