महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत… काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस या कायमच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात आणि आपली भूमिका मांडत असतात. आज फ्रेंडशिप डे आहे, ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फोटो टाकत ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत… असं कॅप्शन टाकत अमृता फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. (Amruta Fadnavis Shared a Post)

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. शिवसेना आणि शिंदे गट अशी फूट झाल्यानंतर सरकार स्थापन झालं आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघं दोन पक्षात असले तरी मित्र आहेत. (Devendra Fadnavis and Eknath Shinde) अनेक लोक वेगवेगळ्या पक्षात काम करत असतानाही एकमेकांचे मित्र असतात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मैत्रीबद्दल बोलताना ‘महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत’ असा त्यांचा विशेष उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला.

Please follow and like us: