TOD Marathi

पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. प्रत्येक वेळी आमचा मीडिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारतो विस्तार कधी? तर लवकर, लवकर, लवकरच… असं म्हणत अजितदादांनी विनोदी ॲक्शन केली आणि सभेत एकच हशा पिकला. तुम्ही दोघे सगळे निर्णय घेण्यासाठी पुरणार आहात का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. जोपर्यंत दिल्लीवरून सिग्नल येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. (Ajit Pawar Criticized State Government)

एवढ्या मोठ्या महाराष्ट्रमध्ये चांद्यापासून ते बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात, अतिवृष्टी होते, वेगवेगळे संकट येतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता ऍडमिशन सुरू झाले आहे. त्याच्याबद्दल पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या पुढचे काही प्रश्न आहेत? ते घेणार कोण. ‘आम्ही दोघे आहोत… आम्ही दोघे आहोत. अरे पण दोघे पुरू शकतात का?’ याचं तरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. मला टीका करायची नाही. पण याचा मोठा फटका आपल्या राज्याला बसतोय, असं अजित पवार (Ajit Pawar Pune) पुढे म्हणाले.