TOD Marathi

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर राजकीय पक्षांसह सामान्य नागरिकांकडूनही निषेध केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका, अशा आशयाचं एक खरमरीत पत्र राज ठाकरे यांनी लिहिले आहे. (Raj Thackeray on the Statement of Governor Bhagatsingh Koshyari)

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कोणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण घडवून करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्या इतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचु नका, इतकच आता आपल्याला सांगतो.

असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.