टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 मे 2021 – महाराष्ट्रातील दहावी बोर्ड परीक्षांबाबत इथल्या शिक्षण मंत्र्यांनी मूल्यमापन पद्धत सांगितली. त्यामुळे आता बारावीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा होणार की नाहीत? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सीबीएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेबाबत 1 जून रोजी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण व दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली आहे.
नगर इथल्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, शहराध्यक्ष भय्या गंधे, उपाध्यक्ष सचिन पारखी, तुषार पोटे आदी उपस्थित होते.
बारावीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा घ्यायच्या कि नाहीत, या दृष्टिकोनातून चर्चा सर्वांशीच केली होती. प्रत्येक राज्यात संबंधित सरकारशी ऑनलाइन पद्धतीने बोलणीही झाली आहे. यात दोन पर्याय सूचविले आहेत.
महत्त्वाच्या विषयांसाठी तीन तासांऐवजी परीक्षा घ्यायची आणि प्रत्येक शाळेतील केंद्रात बसण्याची व्यवस्था घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आम्ही सर्व राज्यांची मते मागविली आहेत.
तरीही याबाबत या परीक्षेबाबत 1 जून रोजी निर्णय घेतला जाणार आहे, असेही केंद्रीय शिक्षण व दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितले आहे.