TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 मे 2021 – कोरोनामध्ये कडक निर्बंध लागू असल्यामुळे आणि काही ठिकाणी लॉकडाऊन सुरु असल्यामुळे देशातील सर्वाधिक बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सेवा देत आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याची गरज भासत नाही. पण, जून महिन्यातही देशातील विविध भागामध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. यातील काही सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे बँकांची कामे करायची असतील तर लवकर करा.

या 9 दिवसांत साप्ताहिक सुट्ट्यांचा हि समावेश आहे. आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार या जून महिन्यात या सुट्ट्या राहणार आहेत. जून महिन्यात अधिक सणसमारंभ नाहीत. त्यामुळे साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त केवळ तीन इतर सुट्ट्या आहेत. त्याही काही राज्यांमध्ये आहेत. कारण, वेगवेगळ्या राज्यातील सणांनुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

कोणत्याही नवीन अपडेटसाठी बँक ग्राहकांना सुट्टीची यादी नियमितपणे तपासण्याची आणि आयआरबीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या सुट्टीच्या यादीसह याची पडताळणी करण्याची शिफारस केली जातेय.

जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी :
6 जून- रविवार
12 जून- दुसरा शनिवार
13 जून- रविवार
15 जून- मिथुन संक्रांती आणि रज पर्व (इजवाल-मिझोरम, भुवनेश्वर याठिकाणी बँका बंद राहतील)
20 जून- रविवार
25 जून- गुरु हरगोविंद जी यांची जयंती (जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील)
26 जून- दुसरा शनिवार
27 जून- रविवार
30 जून- रेमना नी (केवळ इजवालमध्ये बँका बंद राहतील)