TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 30 जुलै 2021 – सध्या कोरोना वाढता संसर्ग लक्षात घेता अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती कमी केलेली आहे. याचप्रमाणे बँकेत देखील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती कमी करून ऑनलाईन बँकिंगवर अधिक भर दिला आहे. काही बँकांनी ग्राहकांना ऑनलाईनसह फोन सर्व्हिस सुरु केली आहे. यातच वेगवेगळ्या सणांमुळे सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपली कामे त्वरित करून घ्यावीत. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये बँका 15 दिवस बंद राहणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टमध्ये अधिक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे किमान अर्धा महिना बँकेचे कामकाज सुरु असणार आहेत. येत्या महिन्यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून एकूण 15 दिवस बँक बंद असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी हे लक्षात घेऊन बँकेची कामे त्वरित करून घ्यावीत, असे सांगितले जात आहे.

अशी आहे सुट्ट्यांची यादी –

1 ऑगस्ट रविवार,
8 ऑगस्ट रविवार,
13 ऑगस्ट पॅट्रिएट डे(इंफाल),
14 ऑगस्ट दुसरा शनिवार,
15 ऑगस्ट रविवार,
16 ऑगस्ट पारशी नववर्ष,
19 ऑगस्ट मोहरम,
20 ऑगस्ट ओणम,
21 ऑगस्ट थिरुवोणम(कोच्ची आणि तिरुवनंतपूरम)
22 ऑगस्ट रविवार,
23 ऑगस्ट श्री नारायण गुरु जयंती,
28 ऑगस्ट चवथा शनिवार,
29 ऑगस्ट रविवार,
30 ऑगस्ट जन्माष्टमी,
31 ऑगस्ट गोपाळ काला.