TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 30 जुलै 2021 – ज्या ठिकाणी पॉझेटिव्हिटी रेट एखादा टक्का असेल तिथे निर्बंध शिथिल करण्याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला होकार दर्शवला आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे मेट्रोच्या कार्यक्रमासाठी आले असताना अजित पवार यांनी सांगितले कि, सरकारही कोरोनाचे निर्बंध शिथील करण्याचा विचार करत आहे. जिथे ४ वाजेपर्यंत वेळ दिली आहे, तिथे ती ८ वाजता करता येईल.

नागरिक सोमवार ते शुक्रवार काम करत असतात. त्यामुळे शनिवार, रविवार मोकळीक हवी आहे. त्याचाही विचार सुरूय. मात्र, निर्बंध शिथिल झाले तरीही मास्क, सँनिटायझर याचा वापर करावा लागणार आहे, तसेच गर्दी करू नये, हे नियम पाळावे लागतील, असे अजित पवार यांनी सांगितले.