TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 30 जुलै 2021 – कोल्हापुरात पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे आजी आणि माजी मुख्यमंत्री एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी संवाद साधून कोल्हापुरच्या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये या दोघांची योगायोगाने भेट झाली आणि त्याच्यात संवाद झाला. त्यामुळे याकडे राजकीय दृष्टिकोन ठेवून पाहिले जात आहे.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद झाला आणि त्यानंतर दोन्हीही नेते घटनास्थळावरुन निघून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याच परिसरात आले आहेत, हे कळले होते.त्यावेळेस मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाहूपुरीतच थांबण्यास सांगितले.

हवं तर वेगवेगळी पहाणी करण्यापेक्षा एकत्र पुरग्रस्तांची पहाणी करु, असा आग्रही ठाकरे यांनी धरला. त्यानंतर फडणवीस यांनी हि मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन ते शाहुपुरीतच थांबले आणि दोन्ही नेत्यांची भेट झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पूराच्या मुद्द्यावर कायमस्वरुपी उपाय शोधला पाहिजे. इतक्या कमी वेळेत आश्वासन देता येत नाही. त्यांनी बैठक बोलावली तर आम्ही येण्यास तयार आहे.

सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अनुक्रमे आजी- माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही नेते यांनी मुख्यमंत्री पद भूषविलेले आहेत.

त्यामुळे कोल्हापुरातील पूरस्थिती पाहून काय निर्णय देणार?, तसेच काय प्रतिक्रिया देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. एकेकाळी एकत्रपणे अर्थात युती करून काम करणारे नेते सध्या एकमेकांविरोधात भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी आणि संवाद यामुळे राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.