टिओडी मराठी, दि. 13 मे 2021 – कोरोनाचं संकट सगळीकडे उभं ठाकलं आहे. त्यात आता शैक्षणिक संस्था बंद पडल्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. शाळेत न गेल्याने आणि घरी राहिल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ होत आहे. आता हा मानसिक ताण दूर करण्यासाठी सीबीएसई वेगवेगळ्या पद्धतींवर काम करतेय.
फ्रेंड्स फॉर लाइफ आणि मेंटल हेल्थ अँड वेल्बीइंग नावाची पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर, सीबीएसईने नुकतेच हेल्थ अँड वेलनेस सीरिजअंतर्गत पहिले थेट वेबिनार आयोजित केले. याची थीम : केयर, कॉपेशन अॅंड कम्युनिकेशन – वे स्टोअर टू स्ट्रेस फ्री लिव्हिंग अशी ठेवली होती.
सीबीएसईच्या गुरुनानक स्कूलचे माजी प्राचार्य डॉ. मनोहर लाल म्हणाले, कोरोना संकटामध्ये सीबीएसईने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन आरोग्य आणि निरोगीपणाची मालिका सुरू केलीय.
या मालिकेतील पहिल्या वेबिनारमध्ये स्वतःची काळजी घेणे, इतरांवर दया आणि एकमेकांशी संवाद साधण्यावर केंद्रित केलं आहे. सीबीएसईच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना कोणत्याही ताणतणावाशिवाय परीक्षेची तयारी करण्यास मदत होईल.