TOD Marathi

Iraq मध्ये आत्मघातकी हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू ; 60 पेक्षा अधिक जण गंभीर, IS दहशतवादी Organization ने स्वीकारली जबाबदारी

टिओडी मराठी, सदर शहर/इराक, दि. 21 जुलै 2021 – इराक देशाच्या सदर शहरामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटामध्ये 35 35 जणांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्ब स्फोटामध्ये 60 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झालेत. ही घटना सोमवारी सांयकाळी इराकमधील सदर शहरात घडलीय.

या हल्ल्याची जबाबदारी आयएस या दहशतवादी संघटनेने स्विकारलीय. दहशतवाद्यांनी स्वत:ला बॉम्बव्दारे उडवून घेतलं आहे. या आयएसचे म्हणणे आहे की, उद्या मंगळवारी ईद असल्याने सदर शहरातील बाजारामध्ये मोठी गर्दी होती. त्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाणी निवडले आहे, असे टेलिग्रामव्दारे सांगितले आहे.

याबाबत वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेली माहिती अशी, या हल्ल्यामध्ये अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर, या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवलीय.

कारण जखमीपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, असे सांगितले जात आहे. जखमी लोकांना उपचारसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे.

या हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधेमी यांनी सुरक्षा कमांडर्सची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे इराकचे राष्ट्रपती बरहाम सालेह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असे सांगितले की, एका भयंकर गुन्ह्यासह काही लोकांनी ईदच्या अगोदर सदर शहरातील नागरिकांना लक्ष्य करायचं होते. जोपर्यंत या दहशतवादाचे उच्चाटन होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.