TOD Marathi

‘इथल्या’ Corona वॉर्डमध्ये Oxygen cylinder चा स्फोट ; 58 जणांचा होरपळून मृत्यू, 67 हून अधिकजण गंभीर

टिओडी मराठी, दि. 13 जुलै 2021 – इराकमध्ये एका रुग्णालयातील करोना वॉर्डला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीमध्ये सुमारे ५८ जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

नसीरिय शहरातील हे रुग्णालय आहे. ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागलीय. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि मदत व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

या आगीमुळे 67 हून अधिकजण गंभीर जखमी झालेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण आगीतून आत्तापर्यंत 16 जणांची सुटका केली आहे. यात होरपळून मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यास अडचण येतेय. करोना वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती तेथील स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिलीय.

ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. आगीचा भडका जोरात उडाला होता. यात काही करोनाग्रस्त होरपळून मृत पावले. अग्निशमन दलाच्या जवानांना आणि मदत व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना आगीच्या ठिकाणी दाखल होण्यास अथक करावे लागले. अशी माहिती एका आरोग्य कर्मचाऱ्याने दिलीय.