काबूल: तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे, मात्र पंजशीरमध्ये अद्यापही संघर्ष सुरु आहे. याच संघर्षादरम्यान अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह ठार झाला आहे. तालिबानने रोहुल्लाह सालेह याची ओळख पटल्यानंतर त्याला नग्न करुन मारहाण केली आणि नंतर गळा कापत गळ्या घातल्या छळ अशी माहिती आहे.
रोहुल्लाह सालेह काबूलला जात असताना तालिबान्यांचा हाती लागला. यानंतर त्यांनी त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. रोहुल्लाह सालेहचा भाचा इबदुल्लाहने महती दिली की, तालिबान यावेळी वारंवार मृतदेह सडला पाहिजे म्हणत होते, असं सांगितलं आहे. त्यांनी गुरुवारी हत्या केली असून आम्हाला दफन करण्यासाठीही मृतदेह देखील अद्याप दिला नाही. ते वारंवार मृतदेह सडला पाहिजे असं म्हणत आहेत, अशी माहिती इबदुल्लाहने दिली आहे.
तालिबानने पंजशीरचा पूर्ण ताबा मिळवला असल्याचा दावा केला आहे. तालिबानने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमधील सत्ता मिळवली असून पंजशीर खोऱ्याचाही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र प्रतिकार गटाने हा दावा फेटाळून लावला आहे.