TOD Marathi

टिओडी मराठी, डेहराडून, दि. 19 जून 2021 – उत्तराखंड राज्यातील भाजप सरकारच्या काळात झालेल्या कोविड चाचणीच्या घोटाळ्याच्या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय त्या राज्याच्या सरकारने घेतलाय.

या राज्यात यंदा 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी येथे येणाऱ्या भाविकांची कोविड टेस्ट घेण्यासाठी काही संस्थांची नियुक्‍ती केली होती. पण, या संस्थांनी चाचण्यांच्या नावाखाली बोगस सर्टिफिकेट्‌स भाविकांना देऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप होत आहे.

ही एसआयटी या प्रकरणाचा वेगाने तपास करील, अशी ग्वाही राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय. संबंधित कंत्राटदार कंपन्यांवर या अगोदर गुन्हे नोंदवले गेलेत. फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आदी आरोपांखाली हे गुन्हे नोंदवले आहेत.