TOD Marathi

भारतात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा 74 दिवसांतील नीचांकी आकडा; रुग्णसंख्येत होतेय घट

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 जून 2021 – भारतातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या आता आणखी आटोक्‍यात येत आहे. मागील 24 तासात देशात 60 हजार 753 नवीन करोना रुग्ण आढळून आलेत.

आजचा हा आकडा मागील 74 दिवसांतील नीचांकी आकडा आहे. आज मृतांच्या संख्येतही बऱ्यापैकी घट झाली असून मागील 24 तासांत देशात 1647 करोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 3 लाख 85 हजार 137 इतकी झालीय.

भारतातील राष्ट्रीय कोविड रिकव्हरी रेट आता 96.16 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. काल दिवसभरात देशात एकूण 19 लाख 2 हजार 9 कोविड चाचण्या घेतल्या आहेत. तर देशाचा दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट 2.98 टक्‍क्‍यांवर आलाय.