TOD Marathi

केदारनाथ: दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत. २०१३ मध्ये आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान, शंकराचार्यांच्या समाधीचं मोठं नुकसान झालं होतं. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केदारनाथमध्ये १३० कोटी रुपयांच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. त्यासोबतच ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.

जय बाबा केदारनाथ अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात केली. ते म्हणाले की, महाप्रलयामुळे खूप मोठं नुकसानं झालं होतं. येथे येणाऱ्या लोकांना पुन्हा केदारनाथ धाम पहिल्यासारखं होईल का? असं वाटत होतं. पण हे पहिल्यापेक्षा चांगलं होईल, असं मला वाटत होतं. रामचरित मानसमध्ये म्हटलंय की, काही अनुभव इतके वेगळे असतात की ते शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. असाच अनुभव केदारनाथमध्ये येतो.