तुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका

Deepak Kesarkar - Narayan Rane - TOD Marathi

मुंबई: नारायण राणेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेच त्यात आता शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनीही राणेंनी केलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ५ वर्षात ते त्यांचा परफॉर्मन्स दाखवतील. नारायण राणेंबद्दल मला बोलयचं नाही. त्यांना केंद्रात महत्वाचं खात मिळालं आहे. त्यांनी त्यांच्या खात्याचा आपल्या जिल्ह्यासाठी किती वापर केला, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

केंद्रात अनेक बदल सातत्याने होत असतात. तुम्ही परफॉर्मन्स नाही दाखवला तर तुमचं खातं जाऊ शकत. ते परफॉर्मन्स नाही दाखवू शकले तर महाराष्ट्राची जनताच त्यांची जागा दाखवून देईल. मोठे मोठे मंत्री आज केंद्रीय मंत्रिपदावर नाहीत. कोणतंही मंत्रिपद हे कोकणाला मिळतं, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Please follow and like us: