TOD Marathi

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात १.२५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अर्शद शेख हे त्यांचे वकील आहेत. सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

अर्शद शेख हे ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील आहेत, त्यांच्या मार्फत त्यांनी आता नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. तब्बल १.२५ कोटीची मागणी करण्यात आली आहे.