भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश

PM Modi - TOD MARATHI

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे उद्घाटन सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीला एकूण ३४२ सदस्यांनी उपस्थिती लावलो होती.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, साधेपणा हेच जीवन असून, नेत्यांनी आपले राहाणीमान साधे ठेवावे. तसेच सेवा हेच आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट मानावे. कोरोना काळात सेवा ही नवी संस्कुती बनली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी जेपी नड्डा यांनी निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढवल्याबद्दल पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. देशभरात भाजपला मिळणाऱ्या टक्केवारींमध्ये वाढ झाली असल्याची त्यांनी सांगितले आणि याचे सर्व श्रेय कार्यकर्त्यांना जाते, असेही ते यावेळी म्हणाले.

Please follow and like us: