उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांनी CM पदाची तर, 11 जणांनी घेतली Minister पदाची शपथ ; जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार

टिओडी मराठी, डेहराडून, दि. 5 जुलै 2021 – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी पुष्कर सिंह धामी यांनी नुकतीच पदाची शपथ घेतलीय. आता पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार असून राज्याच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी रविवारी त्यांना राजभवनावर मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे.

पुष्कर सिंह धामी यांच्या सोबत 11 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज, हरक सिंह रावत, बंशीधर भगत, यशपाल आर्य, बिशन सिंह चुफाल, सुबोध उनियाल, अरविंद पांडेय, गणेश जोशी, धन सिंह रावत, रेखा आर्य आणि यतीश्वरानंद या नेत्यांनी उत्तराखंडचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर उत्तराखंड भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. सध्या तरी या नेत्यांची नाराजी दूर करुन त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्यासाठी पुष्करसिंह धामी यांनी आपले कौशल्य पणाला लावत आहेत.

पुष्कर सिंह धामी हे आरएसएस पार्श्वभूमीचे नेते असून राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एबीव्हीपीमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. धामी हे दोनदा भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत. उधमसिंह नगरच्या खतिमा विधानसभा मतदारसंघातून धामी यावेळी दुसऱ्यांदा आमदार झालेत.

पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा माजी मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी केली होती. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुष्करसिंह धामी म्हणाले, माझ्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी दिलीय.

सर्वांच्या सहकार्याने राज्यासमोरील महत्वाच्या प्रश्नांवर कार्य करु. तसेच राज्यातील सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Please follow and like us: