टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 ऑगस्ट 2021 – कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांचे दरवाजे 17 ऑगस्टपासून पुन्हा उघडणार आहेत.
गेल्या दीड वर्षापासून ऑनलाइन वर्ग सुरू होते. पण, मुलांना शाळांकडे वळवण्यासाठी आता ‘चला मुलांनो, शाळेत चला’ ही मोहीम राबवण्याच्या सूचना सरकारने दिल्यात.
कोविड प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास परवानगी दिलीय. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर आणि एका वर्गामध्ये केवळ 15 ते 20 विद्यार्थी बसवण्याची सूचना जारी केलीय.
महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या समितीमध्ये वॉर्ड ऑफिसर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व शिक्षण अधिकारी सदस्य असणार आहेत.