TOD Marathi

कोल्हापुर: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे ‘शिवसंपर्क अभियान’निमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवार देखील उपस्थित होते. शाहू महाराजांनी संभाजीराजे छत्रपतींवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत भेटीला पोहोचले असल्याने यावेळी नेमकी त्यांच्यात काय चर्चा होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.

शाहू महाराजांनी छत्रपती संभाजीराजेंवर टीका करत शिवसेनेची बाजून घेतल्याने नवा वाद सुरु झाला आहे. काही कारणांनी उमेदवारी देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केलं होतं.

“… मी नॉनव्हेज खाल्लं आहे”; दगडुशेठचं पवारांनी घेतलं बाहेरूनच दर्शन

शिवसेनेच्या खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; म्हणाले…

शाहू महाराजांशी भेट झाल्यानंतर संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, “मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. मी बऱ्याच वर्षांनी आज कोल्हापुरात आलो. उद्धव ठाकरेंनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक नातं आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब आले होते. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली”.