शिवसेनेच्या खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; म्हणाले…

परभणी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, अशी टीका शिवसेना नेते आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. पक्षातील नेत्यानंच घरचा आहेर दिल्यानं शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संजय जाधव म्हणाले की, एकीकडे शिवसेनेला काहीही मिळत नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मात्र सर्व दिले जाते. शिवसेनेला नेहमीच डावललं गेलं आहे.

तसेच आधी भाजपकडून विरोध झाला आता मात्र आमचे मित्र पक्षच आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंतही त्यांनी यावेळेस बोलून दाखवली आहे.

Please follow and like us: