भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मांवर FIR दाखल

मुंबई : 

भाजपच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबईत FIR दाखल करण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. रझा अकादमीनं देखील आक्षेप व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शर्मा यांच्या वक्तव्यामुळं मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या, असा आरोप रझा अकादमीनं केला आहे.

शर्मा यांच्या वक्तव्यानं काल दिवस गदारोळ झाला होता. रझा अकादमीनं मुंबई पोलीस आयुक्तांना नूपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं. नॅशनल कॉन्फरन्ससह विविध मुस्लीम संघटनांकडून देखील नूपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी नूपूर शर्मा यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us: