कपासोबत बशी, भुर्जीसोबत पाव… नेहाच्या लग्नात शेफालीचा भन्नाट उखाणा

चौधरींच्या पॅलेसमध्ये सनई चौघडे वाजू लागले आहेत. यश आणि नेहाचं आता लग्न होणार आहे. आजोबांनी सगळ्याचाच स्वीकार केला आणि घरात आनंद पसरला. मालिकेत आता रोजच लगीनघाई दाखवली जात आहे. अशात उखाणा घ्यायचं सुरू होतं. मिथिलाला उखाणा घ्यायला सांगतात. तेव्हा तिथं उभी असलेली शेफाली तिला मदत करायला जाते. आणि चौधरींच्या समोर नवीन गोष्ट येते.

 

 

शेफाली मिथिलाच्या कानात उखाणा सांगते. कपासोबत बशी, भुर्जीसोबत पाव, तुम्हा सगळ्यांचा मान राखून घेते असं बोलताना तिच्या तोंडून पुढे समीरचं नाव येतं. पण ती स्वत:ला आवरते. तरीही कळायचं ते सगळ्यांना कळतं. यश आणि त्याचे आजोबा समीरला टिंब टिंब राव म्हणून चिडवायला सुरुवात करतात. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. चाहत्यांना तो आवडतोय. मालिकेच्या आगामी भागांमध्ये आजोबांच्या संमतीनंच नेहा आणि यश साखरपुडादेखील करणार आहेत. या दोघांच्या साखरपुड्याचे व्हिडिओ आणि काही फोटो झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत

Please follow and like us: