‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा आणि यश अडकणार विवाह बंधनात…

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’  ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे.या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांना खूपच भावली आहे. नेहा आणि यशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते आहे. चिमुकल्या परीने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. परीमुळेच मिथिला काकू आणि विश्वजीत काकामध्ये चांगलं बॉण्डिंग निर्माण होत आहे. हे पाहून आजोबा परीला दत्तक घ्यायचा निर्णय घेतात. हे करण्यामागे खरेतर सिम्मी काकूंचा डाव होता. आजोबांनी परीला दत्तक घ्यायचे जाहीर केल्यानंतर यश आणि नेहाला धक्का बसतो. त्यावेळी यश आजोबांना सांगतो की, ‘तुम्हाला तसं करता येणार नाही. कारण परीचे आई-वडील आहेत. नेहा परीची खरी आई आहे.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 

आजोबांना हे सर्व ऐकून धक्का बसतो. मात्र मोठ्या घडामोडींनंतर अखेर आजोबा परीचं सत्य स्वीकारतात. इतकेच नाही तर यश आणि नेहाच्या नात्यालाही परवानगी देतात. त्यामुळे आगामी भागामध्ये यश आणि नेहाचा साखरपुडा आणि लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नेहा आणि यशचं ग्रॅण्ड लग्न पार पडणार आहे. हे लग्न सिल्व्हासा येथे पार पडणार आहे. तसेच मराठी टेलिव्हिजनवरील तुला पाहते रे मालिकेनंतरच या मालिकेतील हे लग्न ग्रॅण्ड वेडिंग ठरणार आहे. नेहा आणि यशचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

 

Please follow and like us: