मुंबई : देशातील महत्त्वाच्या उद्योगक्षेत्रात वर्चस्व निर्माण करणाऱ्या अदानी समुहाने आता आणखी एका क्षेत्रात प्रवेश केलाय. अदानी समुहानं ड्रोन निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समुहाने ड्रोन निर्मितीमधील एका स्टार्टअपसोबत मोठा करार केला असून 50 टक्के गुंतवणूक केली आहे.
अदानी समुहाने काही दिवसांपूर्वीच भारतातील आघाडीची सिमेंट कंपनी खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यानंतर आता ड्रोन निर्मितीत अदानी समूह उतरणार आहे. ग्रुपच्या अदानी डिफेन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजीजने ड्रोन निर्मात्या जनरल एरोनॉटिक्समध्ये 50% हिस्सा खरेदी करण्यासाठी एक पक्का करार केला आहे. अदानी डिफेन्सचे सीईओ आशिष राजवंशी यांनी बीएसई फाइलिंगमध्ये माहिती दिली.
दरम्यान एअरोनॉटिक्स ही कंपनी मुख्यत्वे कृषी क्षेत्रासाठी काम करते. ही कंपनी रोबोटिक ड्रोनची निर्मिती करते. पिकांच्या संरक्षणासाठी आणि इतर कामांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करते.
More Stories
प्रवीण दरेकरांनी पुन्हा मिळवलं मुंबै बँकेचे अध्यक्षपद
सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी !
‘हर घर तिरंगा’ मोहीमेत सहभागी कसं व्हाल ?