महेश मांजरेकरांचा आगामी सिनेमा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चे पोस्टर भलतेच चर्चेत..

महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मध्ये नेमका कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत असणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून अभिनेत्याचा लुक या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची जयंती आहे. २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे त्यांचा जम्न झाला होता. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना सामाजिक रुढी परंपरांविरोधात मोठे काम केले. आता त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट भेटीला येतो आहे. या चित्रपटाचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुद्दा वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर शेअर केले आहे. यातून त्यांनी अभिनेता रणदीप हुड्डाच्या भूमिकेची ओळख देखील करुन दिली आहे. ‘हिंदूत्त्व धर्म नही, इतिहास हैं’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

Leave Your Comment