TOD Marathi

नेपाळमध्ये ‘तारा एअर’ विमान बेपत्ता; ४ भारतीयांसह २२ प्रवाशांचा समावेश

संबंधित बातम्या

No Post Found

काठमांडू:  तारा एअर ९ NAET विमानाने जॉमसमसाठी सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले होते. या विमानाचे वैमानिक कॅप्टन प्रभाकर घिमेरे हे आहेत. दरम्यान हे विमान कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नेपाळ प्रशासनाकडून हेलिकॉप्टरने विमानाचा शोध सुरू आहे.

क्रूसह एकूण २२ प्रवासी या विमानात आहेत. या विमानात ४ भारतीय प्रवासी आहेत. या विमानाला शेवटचं मुस्तांग जिल्ह्यात पाहण्यात आलं होतं. त्यानंतर या विमानाने माउंट धौलागिरी येथे वळण घेतले. आणि पुढे या विमानाचा संपर्क तुटला. मुख्य जिल्हाधिकारी नेत्र प्रसाद शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

संपर्क तुटल्यानंतर हे विमान कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने शोध मोहिम सुरु केली आहे. गृह मंत्रालयाने विमानाच्या शोधासाठी दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. पोखरा ते मुस्तांगदरम्यान हे दोन हेलिकॉप्टर विमानाचा शोध घेत आहेत.

काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, जोमसॉम एअर ट्रफिक कंट्रोलरने घासा परिसरात एक जोरात आवाज ऐकल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या म्हणण्यानुसार, जिथून विमानाचा सिग्नल गायब झाला आहे त्याच क्षेत्रात शोध घेण्यात येत आहे.